गुप्तचर यंत्रणेत अधिकारी असल्याच्या बतावणीने ४ कोटींची फसवणूक

पुण्यात जंगली महाराज रस्त्यावरील बँकेची फसवणूक

पर्वती पोलिसांकडून पाच जणांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेत अधिकारी असल्याची बतावणी करुन एका व्यावसायिकाची चार कोटी सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पर्वती पोलिसांकडून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका व्यावसायिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुभम सुनील प्रभाळे (वय ३१), सुनील बबनराव प्रभाळे, भाग्यश्री सुनील प्रभाळे, ओंकार सुनील प्रभाळे, प्रशांत राजेंद्र प्रभाळे (सर्व रा. छत्रपती संभाजीनगर, धनकवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एटीएम मशीनधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार व्यावसायिकाची ओळख आहे. आरोपी शुभम प्रभाळेने लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेत अधिकारी असल्याची बतावणी तक्रारदाराकडे केली होती. गुप्तचर यंत्रणेकडून ३८ कोटी रुपये मिळणार आहे. ही रक्कम मिळवण्यासाठी सुरुवातीला काही शुल्क भरावे लागणार आहे, अशी बतावणी आरोपींनी त्यांच्याकडे केली होती. आरोपींनी त्यांच्याकडे बतावणी करुन वेळोेवेळी चार कोटी सहा लाख सात हजार रुपये उकळले.

तक्रारदाराकडून ऑनलाइन, तसेच रोख स्वरुपात वेळोवेळी रक्कम घेतली. त्यानंतर आरोपींनी त्यांना रक्कम परत केली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×