एटीएम मशीनधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक

विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाला मदत करण्याचा बहाणा करुन चोरट्यांनी ५० हजारांची रोकड लांबविल्याची घटना नवी पेठेतील शास्त्री रस्त्यावर घडली. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एका चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोदक विक्रीवरून दोन हॉटेलमधील कामगारांमध्ये हाणामारी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारादर ज्येष्ठ नागरिक वारजे माळवाडी भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. ते ४ सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास नवी पेठेतील लालबहाद्दुर शास्त्री रस्त्यावरील एका एटीएममधून पैसे काढत होते. त्या वेळी त्यांच्या मागोमाग एक चोरटा एटीएममध्ये शिरला. मदत करण्याचा बहाणा करुन चोरट्याने ज्येष्ठाकडील एटीएम कार्ड आणि सांकेतिक शब्द घेतला. पैसे काढताना चोरट्याने त्याच्याकडील एटीएम कार्ड वापरले. त्यामुळे एटीएममधून पैसे निघाले नाहीत.

एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची बतावणी करुन चोरट्याने ज्येष्ठाकडील एटीएम कार्ड चोरले. एटीएम कार्डचा गैरवापर करुन चोरट्याने ज्येष्ठाच्या खात्यातून ५० हजारांची रोकड चोरली. खात्यातून पैसे चोरण्यात आल्यानंतर ज्येष्ठाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप खाडे तपास करत आहेत. एटीएममधून रोकड काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×