Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

बेदरकारपणा आला जीवाशी, दुचाकी घसरून अल्पवयीन ठार

बाह्यवळण मार्गावर अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

मंतरवाडी-हांडेवाडी रस्त्यावर घडला अपघात

marathinews24.com

पुणे – भरधाव वेगात दुचाकी चालवून नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार अल्पवयीन ठार झाला आहे. हा अपघात १६ सप्टेंबरला रात्री साडेनउच्या सुमारास उरळी कांचन परिसरातील मंतरवाडी-हांडेवाडी रस्त्यावर घडला आहे. मोहम्मद जकरिया नदिम खान (वय १७ रा. सय्यदनगर, हडपसर) असे ठार झालेल्या अल्पवयीन दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार प्रताप गुरव यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

लोक अदालतीसाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणार- सोनल पाटील – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब आणि त्याचा मित्र दुचाकीस्वार मोहम्मद खान हे १६ सप्टेंबरला रात्री साडेनउच्या सुमारास मंतरवाडी-हांडेवाडी रस्त्यावरून जात होते. त्यावेळी मोहम्मद दुचाकी चालवित असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मोहम्मद गंभीररित्या जखमी झाला. तर आफताब किरकोळ जखमी झाला. दोघांनाही जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मोहम्मद खान याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार तपास करीत आहेत.

पालकांचे लाड, अल्पवयीन मुलांच्या जीवावर

शहरातील विविध भागात बहुतांश पालकांकडून अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने दिली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बेदरकारपणे बेफान वाहने चालवित दुचाकीस्वार अल्पवयीन अपघातांना निमंत्रण देत आहेत. मागील काही महिन्यांपुर्वीही अशाच अपघातात अल्पवयीनाला आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या मुलांच्या ताब्यात वाहने देउ नका, असे आवाहन पोलिसांसह आरटीओ विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र, तरीही अनेकांकडून मुलांचे लाड पुरविण्यासाठी वाहने ताब्यात दिली जात आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×