पुण्यात पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठे महिला लक्ष्य

पुण्यात पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठे महिला लक्ष्य

मंगळसूत्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागातून पीएमपीएल प्रवास करणार्‍या महिलांना चोरट्यांच्या टोळीने लक्ष्य केले आहे. जेष्ठ महिलांसह गावाहून आलेल्या प्रवाशांना हेरून त्यांच्याकडील ऐवज लुटीचे प्रमाण वाढले आहे. मात्र, तरीही पीएमपीएल प्रशासनासह स्थानिक पोलिसांकडून चोरट्यांवर जरब बसवली जात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहेत. मागील तीन दिवसांत बसप्रवासात महिलांचे दागिने चोरीच्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

बेदरकारपणा आला जीवाशी, दुचाकी घसरून अल्पवयीन ठार – सविस्तर बातमी 

पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या गळ्यातील १ लाख ४० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले आहे. ही घटना १७ सप्टेंबरला दुपारी पावणेदोनच्या सुमारास आळंदी देवाची ते कुमार पॅसिफिक मॉल दरम्यान घडली आहे. याप्रकरणी मुळशी तालुक्यातील भादसमध्ये राहणार्‍या ६५ वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला मुळशी तालुक्यातील भादस गावातील रहिवाशी आहे. १७ सप्टेंबरला दुपारी दीडच्या सुमारास महिला आळंदी देवाची ते कुमार पॅसिफिक मॉल असा पीएमपीएल बसप्रवास करीत होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील १ लाख ४० हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी पोलीस अमलदार दुडम तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×