Breking News
प्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईकपुण्यात गंगाधाम रस्त्यावर रासायनिक कंपनीतून गॅस गळतीपर्वती गावात दोघांवर शस्त्राने वारखाण्याच्या पानात भांगमिश्रीत नशेच्या गोळ्यांचा वापर

शुटर मुनाफ पठाण, सोनाली आंदेकर यांना अटक

शुटर मुनाफ पठाण, सोनाली आंदेकर यांना अटक

आयुष कोमकर हत्या प्रकरण

marathinews24.com

पुणे – घरगुती वादातून कुख्यात आंदेकर टोळीने आयुष कोमकर याच्यावर गोळीबार करून त्याचा खून केला. त्यानंतर पसार झालेल्या शिवम आंदेकरसह चौघांना गुजरात सीमेवरून अटक केली होती. टोळीचा म्होरक्या बंडूचा मुलगा कृष्णा आंदेकर पोलिसांना शरण असून, त्याचा जवळचा साथीदार असलेला आणि शुटर म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुनाफ पठाण याच्यासह दिवंगत वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली आंदेकर हिला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

वाहन थकीत कर भरणासाठी सेवा देण्याच्या अनुषंगाने दरपत्रके सादर करण्याचे आवाहन – सविस्तर बातमी 

माजी नगरसेवक हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर (वय १९, रा. नाना पेठ) याची आंदेकर टोळीने ५ सप्टेंबरला हत्या केली होती. या प्रकरणात फरार आरोपी मुनाफ पठाण याला गुन्हे शाखेने अटक केली. पठाणने हल्लेखोरांना पिस्टल पुरवल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. कोमकर खून प्रकरणात मुनाफ पठाणचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो कृष्णा आंदेकरचा जवळचा साथीदार आहे. दरम्यान, वनराजची बायको सोनाली आंदेकर हिलाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला जात आहे.

आतापर्यंत अटकेतील आरोपींची नावे

शिवम उदयकांत आंदेकर (वय ३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९) लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०, सर्व रा. नाना पेठ) यांना गुजरात सीमेवरून अटक केली होती. तर कृष्णा आंदेकर पोलिसांना शरण आला. आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर (वय ७०), त्याचा नातू तुषार नीलंजय वाडेकर (वय २७), स्वराज नीलंजय वाडेकर (वय २३), मुलगी वृंदावनी नीलंजय वाडेकर (वय ४०), अमन युसूफ पठाण (वय २५), यश सिद्धेश्वर पाटील (वय १९), अमित प्रकाश पाटोळे (वय १९, सर्व रा. नाना पेठ) सुजल राहुलू मेरगु (वय २०, आंध्र झार आळी, भवानी पेठ) यांना पूर्वीच अटक केली आहे. पिस्टल पुरवल्याप्रकरणी आता मुनाफ पठाण यालाही अटक केली आहे.

आंदेकर टोळीविरूद्ध मोक्का, अनधिकृत बांधकामवरही हातोडा

वनराज आंदेकर हत्येतील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर हा ५ सप्टेंबरला लहान भावाला क्लास वरून घेऊन आला. रात्री साडेसातच्या सुमारास नाना पेठेतील हमाल तालमीजवळ असलेल्या सोसायटीत गाडी पार्क करीत असताना दोघा हल्लेखोरांनी आयुषवर पिस्तुलातून बेछूट गोळीबार करून त्याचा खून केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कुख्यात बंडू आंदेकरसह साथीदारांना बुलढाणा परिसरातून अटक केली. दरम्यान, खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ आरोपींविरोधात मोक्कानुसार कारवाई केली आहे. तसेच गणेश पेठेतील अनधिकृत बांधकामावरही हातोडा चालवण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×