वाहन थकीत कर भरणासाठी सेवा देण्याच्या अनुषंगाने दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

वाहन मालकांना ऑनलाईन कर भरण्याची सेवा उपलब्ध

वाहन मालकांना ऑनलाईन कर भरण्याची सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार

marathinews24.com

बारामती – उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने थकीत कर असलेल्या वाहन असलेल्या वाहन मालकांना ऑनलाईन कर भरण्याची सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे; याकामी इच्छुकांनी 24 सप्टेंबर रोजी सायं पाच वाजेपर्यंत कार्यालयास दरपत्रके सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

समाजवादी आंदोलनाची ९० वर्षे, पुण्यात समाजवादी एकजूट परिषदेचे उद्घाटन – सविस्तर बातमी 

थकीत कर असलेल्या वाहन, वाहन तपासणी मध्ये दोषी आढळलेल्या वाहनांकरिता, वाहनांची कागदपत्रे, कर विमा, पीयुसीची वैधता समाप्त झालेल्या वाहन मालकांना कागदपत्र वैध करण्यासाठी, थकीत कराचा भरणा ऑनलाईनरित्या भरण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर मोटार वाहन कर त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एआय कॉल मदतीद्वारे भरणा करणे आदी कामासाठी दरपत्रके मागविण्यात येत आहे.

दरपत्रके सादर करतांना यापूर्वी अशा प्रकारची सेवा शासकीय कार्यालयास पुरविणेबाबतचा पूर्वानुभव, सेवेमध्ये मराठी भाषेसह हिंदी व इंग्रजी भाषेचा समावेश असावा. दर पत्रकाची रक्कम वस्तू व सेवा करासह (जीएसटी) सादर करावी. दरपत्रके विहित मुदतीत प्राप्त न झाल्यास तसेच ई-मेल व्दारे प्राप्त झालेली दरपत्रके विचारात घेतली जाणार नाहीत. दरपत्रके मूळ स्वरुपात पोस्टाव्दारे किंवा प्रत्यक्षात कार्यालयीन वेळेत सादर करावीत, या अटी व शर्तींचा विचार करुनच दरपत्रके सादर करावीत, असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×