Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

कुख्यात बंडू आंदेकर टोळीची अशीही दहशत

कुख्यात बंडू आंदेकर टोळीची अशीही दहशत

१२ वर्षात मासेविक्रेत्यांना धमकावून उकळली २० कोटींची खंडणी

marathinews24.com

पुणे – कुख्यात गुंड बंडू आंदेकर टोळीच्या दहशतीचा आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे. पुण्यातील गणेश पेठ मच्छी मार्केटमधील मासेविक्रेत्यांना तब्बल १२ वर्षांपासून दहशतीखाली ठेऊन त्याने तब्बल २० कोटी रुपयांहून अधिक पैशांची खंडणी उकळली आहे. याप्रकरणी आता टोळीप्रमुख सुर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या घरातील महिलेसह ११ जणांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात राष्ट्रवादीच्या नेत्याच्या बॅगेत रिव्हॉल्वर अन काडतुसे – सविस्तर बातमी 

पोलिस तपासात आंदेकर टोळीने २० कोटी रुपयांहून अधिक रक्कम ‘प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. व्यापाऱ्यांना धमकावून जागा मिळवून देणे. व्यवहारात सहकार्य करण्याच्या नावाखाली ही खंडणी वसूल केली जात होती. त्यानुसार आता या गुन्ह्यात कलम ३०८, ३०८(४), १११ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनावाखाली फरासखाना पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

तब्बल १२ वर्ष खंडणी उकळणाऱ्या आंदेकर टोळीचा धाक मोडीत काढण्यासाठी पुणे पोलिसांनी मोहिम हाती घेतली. त्यानुसार आंदेकर टोळीतील ११ जणांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तक्रारदाराने धाडसाने पुढे येऊन तक्रार दाखल केल्यामुळेच हा १२ वर्षांचा खंडणीचा प्रकार उघडकीस आला.गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अजित जाधव करीत आहेत.

गुन्हेगारी टोळ्यांचा आर्थिक कणा मोडणार

शहरातील विविध भागात अशा प्रकारे जर कोणाकडून खंडणी उकळली असल्यास त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान गुन्हेगारी टोळ्यांचे समूळ उच्चाटन होईपर्यंत अशाच कारवाया सुरू राहणार आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×