Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मद्य प्राशन करुन वाहन चालविणे अंगलट

न्यायालयाकडून दोघांना १५ दिवसांच्या कैदेसह दंडाची शिक्षा

marathinews24.com

पुणे – मद्यप्राशन करुन वाहन चालविणे दोघांच्या अंगलट आले. न्यायालायने दोघांनी १५ दिवसांची साधी कैद आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहन चालकांवर न्यायालयीन कारवाई व्हावी, यासाठी पाठपुरावा केला होता.

गांजा बाळगल्याप्रकरणी तस्कराला बेड्या, १२ किलो गांजा जप्त – सविस्तर बातमी

खडकी भागात मद्य पिऊन वाहन चालविणारा रोहित शैलेंद्र वर्मा (वय २९, रा. विद्यानगर, पिंपळे गुरव) याच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा कलमांवन्ये खटला दाखल करण्यात आला होता. सोमवारी (२२ सप्टेंबर) शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयात न्यायाधीश एस. बी. पाटील यांनी वर्माला दोषी ठरवून १५ दिवसांची साधी कैद आणि १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

नांदेड सिटी वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहन चालक राजकुमार मंगिणी कुलाळ (वय ३१, रा. मंगल भैरव सोसायटी, नांदेड सिटी) याच्याविरुद्ध खटला दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी सोमवारी झाली कुलाळ यास १५ दिवसांची साधी कैद आणि दहा रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली. वाहतूक पोलिसांकडून सरकारी वकील म्हणून वर्षाराणी जाधव यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, उपनिरीक्षक विकास पाटील यांनी खटल्याचे कामकाज पार पाडले.

९ महिन्यात ४ हजार मद्यपींवर कारवाई

वाहतूक पोलिसांनी मद्यप्राशन करुन वाहने चालविणऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. मद्यपी वाहन चालकांडून गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. २२ सप्टेंबरर्यंत वाहतूक पोलिसांनी तीन हजार ९४८ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करुन खटले दाखल केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×