सापळा रचून आरोपीला केली अटक
marathinews24.com
पुणे – शहरातील विविध ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल असलेला सराईत चोर पक्याला मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ४० हजारांचे चार मोबाइल जप्त केले आहेत. प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या (वय २८ रा. गल्ली एक, लोहीयानगर, पुणे) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे.
बसप्रवासात महिलेची रोकड, मोबाइल चोरीला – सविस्तर बातमी
मार्केटयार्ड पोलीस २१ सप्टेंबरला हद्दीत पायी पेट्रोलिंग करीत असताना, सराईत चोर पक्याची माहिती पोलीस हवालदार दत्तात्रय राऊत यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना पाहून सराईत प्रकाश उर्फ पक्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने काही अंतरावर पाठलाग करून त्याला अटक केली. चौकशीत त्याने मोबाइल चोरीची कबुली दिली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, एसीपी धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील, पोलीस निरीक्षक सुनिता नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल भापकर, राजेश थोरात, महेश जेधे, दत्तात्रय राऊत, कौस्तुभ जाधव, नितीन झेंडे, किरण जाधव, आशिष यादव यांनी केली.























