Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ७१ लाखांची फसवणूक

तरुणाला शेअर ट्रेडींगचा परतावा पडला १९ लाखांना...

विमानतळ आणि सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत दोघांची ७१ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विमानतळ आणि सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिंहगड रस्ता भागातील एका नागरिकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी ४० लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक केली. एकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत.

घनश्याम हाके यांच्यावर ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

दुसऱ्या घटनेत शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने विमाननगर भागातील एकाची ३० लाख २२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस ष्या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव तपास करत आहेत. शेअर बाजार, घराून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी असे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.

कारवाईच्या भीतीने ज्येष्ठ महिलेची १० लाखांची फसवणूक

पुणे – काळ्या पैशांच्या व्यवहारात पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार ६२ वर्षीय ज्येष्ठ महिला शनिवार पेठेतील हसबनीस बखळ भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी गेल्या महिन्यात २८ ऑगस्ट रोजी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ‘मुंबईतील कोलाबा पोलीस ठाण्यातील अधिकारी संदीप राॅय बोलत आहे. काळ्या पैशांच्या व्यवहारात कारवाई करण्यात येणार असून, कारवाई टाळण्यासाठी त्वरीत ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवा’, अशी भीती सायबर चोरट्यंनी त्यांना दाखविली.

त्यानंतर चोरट्यांनी कारवाईची भीती दाखवून त्यांच्याकडून महिनाभरात दहा लाख रुपये घेतले. चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर पुन्हा चोरट्यांनी त्यांच्याकडे पैसे मागितले. चोरट्यंच्या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके तपास करत आहेत

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×