खडकीच्या रेतन केंद्रात अज्ञातांनी केली चोरी
Marathinews24.com
पुणे – शहरातील खडकीतील कृत्रिम रेतन केंद्रातून साहित्य चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांकडून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पशुधनविकास अधिकारी जयंत माहोरे यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे रस्त्यावर अंडी उबवणी केंद्राच्या आवारात पशुधनविकास विभागाचे कृत्रिम रेतन केंद्र आहे. या केंद्राच्या आवारात चोरटे शिरले. चोरट्यांनी लोखंडी काॅट, संगणक, गिझरण, लोखंडी पत्रे, डीव्हीआर प्लेअर, तसेच २५८ निरुपयोगी द्रावणपात्र असे साहित्य चोरून नेले. पशुधनविकास विभागातील सहायक आयुक्त, तसेच अधिकारी माहोरे यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे तपास करत आहेत.