Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

रांजणगाव तिहेरी खूनाच्या तपास फास्ट ट्रॅकवर

रांजणगाव तिहेरी खूनाच्या तपास फास्ट ट्रॅकवर

तपासासाठी २४ जिल्हयात पुणे पाेलीसांची पथके रवाना; अद्याप मृतांची ओळख पटलीच नाही

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील रांजणगाव खंडाळे परिसरात माेकळया जागेत ३० वर्षीय महिलेसह तिच्या दोन चिमुरड्या मुलांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आल्याची घटना २५ मे राेजी उघडकीस आली होती. याप्रकरणात अद्यापही मृत महिलेसह आराेपींची ओळख पटवण्यात पुणे ग्रामीण पाेलीसांना अपयश आले आहे. दरम्यान, खुनाचा उलगडा हाेण्यासाठी पुणे ग्रामीण पाेलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी सहा तपास पथके तयार केली आहेत. पथकांकडून राज्यातील २४ जिल्हयात बेपत्ता झालेल्या महिला व मुलांची माहिती गाेळा करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

गावठी कट्टयासह जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपींना बेड्या – सविस्तर बातमी 

रांजणगाव परिसरातील ग्राेवेल कंपनीच्या मागीस बाजूस असलेल्या जागेमध्ये ३ अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह कंपनीतील कामगारांना दिसले हाेते. त्यानंतर रांजणगाव पाेलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, दाेन मुले व महिलेच्या अंगावर काेणीतरी पेट्राेल ओतून त्यांना जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास दिसून आले होते. परंतु पावसामुळे मृतदेह पूर्णपणे जळाले नाही. महिलेच्या हातावर ‘राजरत्न’, जयभीम व आर अँड एस ’ असे लिहिले असल्याचे दिसून आले होते. मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता, ४८ तासापूर्वी महिलेच्या डाेक्यात मारुन तिचा खून केल्याचे स्पष्ट झाले. पाेलीसांचे अंदाजानुसार व्यक्तींचे खून हे दुसऱ्या ठिकाणी करुन त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

पुणे ग्रामीण पाेलीसांनी गुन्हयाचा तपासाला गती दिली आहे. पुणे जिल्ह्यात बेपत्ता व्यक्तीची सर्व माहिती पडताळणी करुन पाहिली असता, काेणती बेपत्ता नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आरोपी हे जवळचे असल्याची शक्यता असून, महिला व मुले बेपत्ता झाल्याची तक्रार जाणीवपूर्वक पाेलीस ठाण्यात दिली नसावी असा पोलिसांचा संशय आहे. विर्दभ वगळता राज्यातील इतर जिल्हयात अशाप्रकारे काेणी बेपत्ता आहे का? याबाबत तपास करण्यासाठी पुणे ग्रामीण पाेलीसांची २८ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांची ६ पथकात विभागणी करुन राज्यभरात शोध।मोहीम राबविण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×