Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पावसामुळे सोलर पंप उडून विहिरीत पडला, शेतकऱ्याचे नुकसान

पावसामुळे सोलर पंप उडून विहिरीत पडला, शेतकऱ्याचे नुकसान

दौंड तालुक्यातील स्वामी-चिंचोलीमधील घटना

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील विविध ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, सोसाट्याचा वारा, वादळाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याच्या घटना दिसून आल्या आहेत. मुसळधार पावसासह वाऱ्यामुळे दौंड तालुक्यातील स्वामी- चिंचोली गावातील एका शेतकऱ्याचा सोलर पंप थेट विहरीत जाऊन पडला आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मोहन काशिनाथ न्हाणे असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली पुरंदर तालुक्यातील पालखीतळांची पाहणी – सविस्तर बातमी 

मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसासह सोसाट्याचा वाऱ्यामुळे स्वामी चिंचोली गावचे शेतकरी मोहन न्हाने यांच्या गट क्रमांक ५८३ शेतातील सोलर पंप विहरीत जाऊन पडला. ही घटना शुक्रवारी (दि. ६ ) घडली असून, न्हाने यांचे जवळपास ३ ते ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांनी भरपाई मिळावी अशी मागणी संबंधित सोलर कंपनी आणि शासनाकडे केली आहे. दरम्यान, यापूर्वी काही दिवसांपासून स्वामी चिंचोली गावात सातत्याने पाऊस होत असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या जमीनीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे बांध फुटणे, विविध पिके पाण्यात गेल्याने अनेकांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले आहे.

त्यातच सोसाट्याचा वारा, मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना झाडपड, विहरीत गाळ जाणे, पिकांचे नुकसान होण्याच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. कुसुम सोलर योजने अंतर्गत मिळालेला 5 एचपी सोलर पंप मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याचा वाऱ्याने विहरीत पडला आहे. त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान झाले असून, सोलर पंपाची नुकसान भरपाई मिळावी ही आमची मागणी आहे. मोहन न्हाने, शेतकरी, स्वामी चिंचोली

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×