घोड्यांच्या रेसवर ऑनलाइन जुगार, पुण्यात चार आराेपींना अटक
Marathinews24.com
पुणे – घोड्यांच्या रेसवर ऑनलाइन जुगार व पैशाची देवाण घेवाण केल्याप्रकरणी चार आराेपींना वानवडी पाेलीसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून ५५ हजार रुपये किमतीचे जुगारासाठी वापरलेले माेबाईल, रेसींग बुक जप्त केले आहे. याप्रकरणी आरोपींविरुड महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४, ५ नुसार वानवडी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मेहमुद इब्राहिम शेख (रा.फातिमानगर ), फैज मेहमुद शेख (२९,रा. फातिमानगर), चांद शमशुद्दीन शेख (२९,रा. वानवडी ), अकबर अन्वर खशन (४६,रा. कॅम्प,पुणे) यांना अटक केली आहे. पाेलीस अंमलदार साेमनाथ कांबळे यांन फिर्याद दाखल केली आहे.
शेअर बाजारातून भरघोस नफा देण्याचे आमिष; फसवणूक करणारी टोळी गजाआड
वानवडी पाेलीस श्रीराम नवमीचा बंदाेबस्त करत असताना, रेसकाेर्स मुंबई येथे चालू असलेल्या रेसवर दाेनजण वानवडी भागात ऑनलाईन जुगार घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पाेलीस उपनिरीक्षक धनाजी टाेणे यांच्या पथकाने फातिमानगर चाैकात बालाजी दर्शन इमारतीत धाव घेतली. त्यावेळी, त्यांना मेहमद शेख हा त्याच्यासाठी काम करणारे फैज शेख व चाँद शेख हे घोड्यांच्या रेसवर ऑनलाईन जुगार घेत असल्याचे दिसून आले. मेहमुद शेख हा मुंबईतुन सर्व गाेष्टी कंट्राेल करुन अवैधरित्या जुगार खेळवून घेत होता.
पाेलीसांनी घरातून फैज शेख, चाँद शेख व अकबर खान यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे विचारपूस केल्यावर फैज मेहमुद शेख याने सांगितले की, हे घर त्याचे वडील मेहमुद इब्राहीम शेख यांचे असून त्यांचेकडे ग्राहक रेसकाेर्सच्या घाेडयांवर जुगार लावतात. त्याप्रमाणे ते आम्हाला सांगतात त्यानुसार आम्ही ऑनलाईन रिंगवर जुगार लावताे. हा सर्व व्यवहार फाेनद्वारे करताे. रेस संपल्यावर ग्राहकांना पैसे देतात. दर साेमवारी पैसे मिळतात. त्याची सर्व माहिती वडील मेहमुद शेख यांना असल्याचे सांगितले. पाेलीसांनी आराेपींचे ताब्यातून माेबाईल, बीओएल या नावाचे हाॅर्स रेसींग बुक, जुगार लावलेला चार्टचे पेपर असा मुद्देमाल जप्त केला आहे.