Breking News
पुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईकपुण्यात गंगाधाम रस्त्यावर रासायनिक कंपनीतून गॅस गळतीपर्वती गावात दोघांवर शस्त्राने वारखाण्याच्या पानात भांगमिश्रीत नशेच्या गोळ्यांचा वापरड्रग मुक्त पुणे जनजागृती अभियानाचा शुभारंभजिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावी

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे भाजपा धावली

व्यापारी आघाडीचा पुढाकार, एकत्रित केले साहित्य

marathinews24.com

पुणे – राज्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी भाजपा पुणे शहराच्यावतीने मदत साहित्य संकलनाचा मोठा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमात भाजपा व्यापारी आघाडी, पुणे शहर यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला. व्यापारी आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर योगदान दिले. अनेक देणगीदारांनी अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू व अन्य साहित्य तसेच रोख स्वरूपात मदत दिली. हे मदत साहित्याचे पाकीट तयार करून भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या उपस्थितीत भाजपा पक्ष कार्यालयात सुपूर्द करण्यात आले.

संगीत आनंदमठ नाटकातील गीतांची मैफल – सविस्तर बातमी

उपक्रमात व्यापारी आघाडीचे अध्यक्ष उमेशभाई शाह, सरचिटणीस महेश गुप्ता यांच्यासह धवल पटेल, विक्रम चव्हाण, सुधींद्र कुलकर्णी, अंकित तिवारी, गजेंद्र देशपांडे, विजय नरैला, विजय शेखदर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. धनंजय भाई वाल्हेकर यांनी सुद्धा मोठ्या संख्येने अन्नधान्य पाकिटांचे प्रायोजन केले. उपक्रमात मोलाचे योगदान दिले.

सरचिटणीस महेश गुप्ता म्हणाले, “हा उपक्रम केवळ मदतीपुरता मर्यादित नाही, तर समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी आणि ऐक्य याचे प्रतीक आहे. ‘मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा’ या तत्वाने प्रेरित होऊन व्यापारी आघाडी पुढेही असेच समाजोपयोगी उपक्रम राबविणार आहे.”

उपक्रमामुळे पुणे शहरातील व्यापारी व कार्यकर्त्यांनी दाखवलेले ऐक्य, त्याग भावना आणि मदतीची वृत्ती खर्‍या अर्थाने प्रेरणादायी ठरली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×