शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष, तरुणाला ३० लाखांचा गंडा

वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरुणाची तब्बल २९ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना १४ ऑक्टोबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ कालावधीत वाघोलीतील उबाळेनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे भाजपा धावली – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तक्रारदार तरुण वाघोलीतील उबाळेनगर भागात राहायला आहे. १४ ऑक्टोबरला सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर लिंक पाठविली होती. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी तरुणाला दाखविले होते. संबंधिताने शहानिशा न करता चोट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून शेअर बाजारातील गुंतवणूक विषयक योजनांची माहिती घेतली. त्यानंतर तरुणाने सायबर चोरट्यांच्या बँकखात्यात वेळोवेळी रक्कम जमा केली.

तब्बल २९ लाख ८० हजार रुपये जमा केल्यानंतरही सायबर चोरट्याने तरूणाकडे पैशांची मागणी केली. वारंवार पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी परतावा दिला नाही. प्रत्यक्षात चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. तरुणाने परताव्याबाबत विचारणा केली. तेव्हा चोरट्यांनी टाळाटाळ सुरू केली. चोरट्यांनी त्यांचा मोबाइल क्रमांक बंद करुन ठेवले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×