पूरग्रस्तांना मदत करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती तालुक्यात २७ लाखाहून अधिक रुपयांची मदत जमा

marathinews24.com

बारामती – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे २६ ते २८ सप्टेंबर या तीन दिवसीय बारामती दौऱ्यावर असताना राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले असता विविध संस्था,नागरिकांकडून सामाजिक बांधिलकी जपत अवघ्या तीन दिवसात २७ लाख ५२ हजार ३०० रुपयांची मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत केली, याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.

आमच्या शेतकरी बांधवांना खाऊची गरज, चिमुरड्यांनी पूरग्रस्तांना दिले खाऊचे पैसे – सविस्तर बातमी

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना १५ लाख रुपये, नवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, करंजे २ लाख ५० हजार, अक्षय शिंदे फाऊंडेशन २ लाख,बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघ १ एक लाख, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती १ एक लाख, शंकर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था १ एक लाख, संदीप जगताप आणि भारत गावडे यांनी प्रत्येकी १ एक लाख, बारामती सराफ असोसिएशन ७५ हजार, पंकज निलाखे यांनी ५१ हजार, श्रीपाल नागरी पतसंस्था ५१ हजार, बारामती तालुका मराठा सेवा संघ २५ हजार, नितीन आटोळे २५ हजार रुपये, बारामती तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन २१ हजार, अजयश्री बिगर ग्रामीण सहकारी पतसंस्था, मुरुम २१ हजार रुपये, बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना ११ हजार, छत्रपती शिवाजी महाराज विकास सोसायटी १० हजार, सुनील राजेभोसले १० हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे सुपूर्द केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×