Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नवदुर्गांच्या कर्तृत्वामुळे समाजकार्यासाठी उभारी-खासदार सुप्रिया सुळे

घर-परिवार सांभाळत समाजकार्यात योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान

marathinews24.com

पुणे – घराच्या चार भिंतीत न अडकता महिला सर्व क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करत आहेत. समाज सेवेतही आघाडीवर आहेत, मात्र त्याचा गवगवा न करता अव्याहतपणे समाज सुधारणेसाठी झटत आहेत. हे त्यांचे खऱ्या अर्थाने मोठेपण आहे. या महिलांच्या कार्यकर्तृत्वातून आम्हालाही कार्यरत राहण्यास उभारी मिळते, शिकायला मिळते, असे गौरवोद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले. अतिवृष्टीमुळे बळीराजावर मोठे संकट आले आहे, ते टाळण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊया, असे आवाहनही त्यांनी केले.

बालकॅन्सर जनजागृतीसाठी ‘गोल्डन इव्हिनिंग’ सोहळा – सविस्तर बातमी

भिलारेवाडी येथील श्री चामुंडा भवानी माताजी जैन मंदिरातर्फे स्त्री शक्तीचा जागर करत नवदुर्गा पुरस्काराने सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या स्त्री शक्तीला सन्मानित करण्यात आले. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी होत कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव केला. मंदिराच्या सभामंडपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

चामुंडा भवानी माताजी जैन मंदिर महिला आघाडीच्या अध्यक्षा पुष्पा कटारिया यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया, मंदिराचे संस्थापक अध्यक्ष राजेश नाहर, पूना मर्चंट चेंबरचे उपाध्यक्ष अजित बोरा, सुभाष नाहर, अंजली नाहर व्यासपीठावर उपस्थित होते.रत्नप्रभा खाबिया (समाजसेवा), कमलाबाई कर्नावट (धार्मिक, सामाजिक), निना नाहर (आरोग्यसेवा), ममता नाहर (अवयवदान जागृती), सुषमा नाहर (समाजसेवा), रेश्मा नाहर (शैक्षणिक), सोनल गांधी (क्रीडा), पल्लवी भटेवरा (आरोग्य क्षेत्र), पूजा गडा (मानसिक आरोग्य) यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.

राजेश नाहर यांनी मंदिराच्या स्थापनेविषयी माहिती देऊन, संस्थानतर्फे चालविणाऱ्या जाणाऱ्या शैक्षणिक, आरोग्य आणि सेवा क्षेत्रातील उपक्रमांविषयी अवगत केले. घरातील जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या महिलांच्या कार्याची दखल घेऊन स्त्री शक्तीचा जागर करण्याच्या काळात महिलांचा यथोचित सन्मान करावा या हेतूने या नवदुर्गांना गौरवित केले जात आहे. सूत्रसंचलन रत्ना दहिवेलकर यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×