पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – घरकामास ठेवलेल्या नोकराने ज्येष्ठ महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून कपाटातील दहा हजारांची रोकड, दागिने असा ८२ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना सिंहगड रस्ता भागात घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नोकराविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त सिंहगड किल्ला हेरिटेज वॉकचे आयोजन – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला सिंहगड रस्ता भागातील राम संस्कृती सोसायटीत राहायला आहेत. त्यांनी घरकामासाठी एक नोकर ठेवला होता. घरातील साफसफाई, तसेच किरकोळ कामे नोकर करायचा. तीन ते चार दिवसांपूर्वी ज्येष्ठ महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून नोकराने कपाटातील दहा हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा ८२ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. ऐवज चोरून नोकर पसार झाला. ज्येष्ठ महिलेने त्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. त्याचा ठावठिकाणा न लागल्याने ज्येष्ठ महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक इसराईल शेख तपास करत आहेत.























