Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पुण्यात केली चांदीची चोरी, आरोपीला उत्तर प्रदेशातून बेड्या

नशेच्या ६ हजार ९०० गोळ्या जप्त; दोघांना अटक

३६ किलो ४३२ ग्रॅम चांदी जप्त, खडक पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – शहरातील गुरूवार पेठेतील तब्बल ४० वर्ष जुन्या असलेल्या सराफी पेठीवर चोरट्यांनी डल्ला मारून तब्बल ७० किलो चांदीचे दागिने चोरी केली होती. याप्रकरणी खडक पोलिसांनी एकाला उत्तरप्रदेशातून बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून यावेळी ३६ किलो ४४२ ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली आहे. चोरी केल्यानंतर त्याने रेल्वेने उत्तर प्रदेशातील त्याच्या घरी चांदी नेली होती. गुन्ह्यातील इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. राजेश महाराणीदिन सरोज ( वय ३६, रा. माघी चैनगड, थाना महेशगंज, ता. कुंडाख जि. प्रतापगड, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

कुख्यात बंडू आंदेकर टोळीविरुद्ध आणखी एक गुन्हा – सविस्तर बातमी

गुरुवार पेठेत दि. १४ ते १५ सप्टेंबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी एका सराफी पेढीतून तीन पोती भरून ६७ लाख ६० हजारांची ७० किलोहून अधिक दागिने चोरी करून नेले होते. यामध्ये ६२ लाखांची चांदी तर ५ लाखांच्या रोकडचा समावेश होता. चांदीनी भरलेली पोती (सिमेंट गोणीच्या आकाराची) वाहून नेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हापासून पोलिस आरोपींच्या मागावर होती. याप्रकरणी विनोद देवीचंद परमार ( वय ४१, रा. मुकुंदनगर) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

तक्रारदार परमार यांचे गुरूवार पेठ येथे माणिक ज्वेलर्स नावाचे दुकानातून ही चांदीची चोरी झाली होती. गुन्ह्याचे गांर्भिर्य ओळखून खडक पोलिस ठाण्याच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलिस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे यांची दोन पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली. घटनास्थळ आणि आजुबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासून तांत्रिक तपास करण्यात आला. यातील संशयीत आरोपींनी गुन्हा केल्यानंतर पोलिसांची दिशाभुल करण्यासाठी कपडे बदलून पुणे रेल्वे स्टेशन येथुन रेल्वेने उत्तरप्रदेशात गेल्याचे दिसून आले. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक अर्जुरन कुदळे, अमंलदार कृष्णा गायकवाड, अक्षयकुमार वाबळे, विश्वजित गोरे यांचे पथक उत्तर प्रदेशात रवाना करण्यात आले. दि.१८ सप्टेंबरला उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील कुंडा येथे हे पथक दाखल झाले. आरोपी राजेश सरोज याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील ३६ किलो ४४२ ग्रॅम वजानाचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.

आरोपी हे उत्तर प्रदेशातील प्रतापगढ परिसरातील असुन प्रतापगढ परिसरातील बहुतांश लोक हे पुणे व मुंबई येथे हमालीचे व मजुरीचे काम करतात. आरोपी हे त्यांच्या गावाकडील पुणे मुंबई येथील सहकार्‍यांकडे राहुन अशा प्रकारची चोरी करत असल्याचे दिसून आले आहे.

ही कारवाई अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक पोलिस आयुक्त अनुजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे, शर्मिला सुतार, उपनिरीक्षक स्वप्निल बनकर, पोलिस हवालदार हर्षल दुडम, किरण ठवरे, अजित फरांदे, निलेश दिवटे, शुभम केदारी, योगेश चंदेल, मयुर काळे यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×