राज्यातील मॉल, दुकाने, हॉटेल, आता रात्रभर सुरू राहणार

राज्यातील मॉल, दुकाने, हॉटेल, आता रात्रभर सुरू राहणार

राज्य सरकारचा मोठा निर्णय

marathinews24.com

मुंबई (रेवण कोळेकर) : राज्यातील व्यापारी आणि ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने दुकाने आणि हॉटेल्स सुरू ठेवण्याच्या वेळेबाबात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील दुकाने, हॉटेल्स 24 तास सुरू ठेवण्याला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. या संदर्भात राज्य सरकारच्या उद्योग विभागाकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

आपली एसटी ॲपद्वारे एसटीचा ठावठिकाणा कळणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – सविस्तर बातमी

कोणती दुकाने सुरू राहणार

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 अंतर्गत नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार, आता सर्व दुकाने, निवासी हॉटेल, उपाहारगृहे, खाद्यगृहे, थिएटर, सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या इतर जागा आणि इतर आस्थापना यातील नोकरीच्या शर्तींचे आणि नोकरीवर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांच्या इतर सेवाशर्तीचे विनियमन करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित बाबींकरिता तरदूत करण्यासाठी महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे.

मॉल आणि व्यापारी संकुलचं काय

महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनिय़मन) अधिनियम, 2017 मधील कलम 11 अन्वये एखाद्या क्षेत्रासाठी किंवा निरनिराळ्या क्षेत्रांसाठी आणि निरनिऱाळ्या कालावधीसाठी निरनिराळ्या प्रकारच्या आस्थापनांच्या किंवा आस्थापनांच्या वर्गाच्या किंवा वेगवेगळ्या परिवास्तू, व्यापारी संकुल किंवा मॉल यांच्या सुरू आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित करण्याचे अधिकार राज्य सरकारला प्रदान करण्यात आले आहेत.

कर्मचाऱ्यांच्या सुट्टीचं काय

महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 च्या कलम 2 (2) मध्ये ‘दिवस’ याची व्याख्या मध्यरात्रीपासून सुरू होणारा 24 तासांचा कालावधी अशी नमूद करण्यात आली आहे. तसेच सदर अधिनियमाच्या कलम 16 (1) (ख) मध्ये आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस धंदा करण्यास खुल्या ठेवता येतील. मात्र, तेथील प्रत्येक कर्मचाऱ्यास आठवड्यातून 24 तास सलग विश्रांती मिळेल अशी साप्ताहिक सुट्टी देण्यात येईल अशी तरतूद आहे.

कोणत्या दुकानावर असणार बंदी

राज्य सरकारने 19 डिसेंबर 2017 च्या अधिसूचनेद्वारे राज्यातील विविध क्षेत्रातील परमिट रूम, बिअर बार, डान्सबार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक आणि अशा प्रकारच्या सर्व आस्थापना जेथे कोणत्याही प्रकारचे मद्य विक्री केली जाते तसेच वाईन आणि सर्व प्रकारचे मद्य विक्री करणारी दुकाने, थिएटर आणि सिनेमा प्रदर्शित करणारे गृह या आस्थापनांच्या सुरू आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित केल्या होत्या. त्यातून थइएटर आणि सिनेमा प्रदर्शित करणारे गृह वगळण्यात येऊन 31 जानेवारी 2020 रोजी नवीन अधिसूचना काढण्यात आली. यानुसार, केवळ परमिट रूम, बिअरबार, डान्सबार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक आणि अशा सर्व आस्थापना जेथे कोणत्याही प्रकारचे मद्य विक्री केली जाते तसेच वाईन आणि सर्व प्रकारचे मद्य विक्री करणारी दुकाने अशा आस्थापनांच्या सुरू आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित आहेत. त्यामुळे या आस्थापना 24 तास सुरू ठेवता येणार नाहीत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×