छत्रपती संभाजी महाराज लिखित बुधभूषण मराठी काव्य अनुवादित; ग्रंथाचे ५ ऑक्टोबर ला पुण्यात प्रकाशन

सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.शरद गोरे यांनी केला अनुवाद

marathinews24.com

पुणे – रणांगणात नेहमी अजिंक्य असलेले छत्रपती संभाजी महाराज यांचा दैदिप्यमान जाज्वल्य इतिहास सर्व जगाला परिचित आहे १६ भाषेत पारंगत असणारे जागतिक कीर्तीचे विचारवंत, भाषा पंडित व बुधभूषण, नायिकाभेद,नखशिख, सातशतक, या ग्रंथाच्या लेखना व्दारे वैश्विक विचारधन देणारे साहित्यिक छत्रपती संभाजी महाराज यांचा साहित्यिक पैलू हा विशेष उल्लेखनीय व नव्या पिढीला प्रेरणादायी आहे.

जगदगुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम वसुंधरा पायी दिंडी – सविस्तर बातमी

त्यांनी वयाच्या १४ वर्षी संस्कृत भाषेत लिहिलेल्या बुधभूषण या ऐतिहासिक ग्रंथाचा मराठी काव्य अनुवादसु प्रसिद्ध साहित्यिक डॉ.शरद गोरे यांनी त्यांची अलौकिक प्रतिभा बुधभूषण या ग्रंथातून २०१६ साली पहिल्यांदाच काव्य स्वरूपात जगासमोर आणली व छत्रपती संभाजी महाराज यांनी मानवीमूल्यांपासून राजनीती, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, नैतिकशास्त्र, धर्मशास्त्र, विधीशास्त्र, न्यायशास्त्र, वनस्पतीशास्त्र, यासह विविध विषयांवर अंत्यत प्रभावी भाष्य केले आहे व ते सर्व कालीन पिढीस मार्गदर्शक ठरणार आहे, मानवी जीवनातील सर्वच विषयांवर निष्णात असलेले जागतिक कीर्तीचे विचारवंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या साहित्यिक पैलूंचा व त्यांच्या इतिहासाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी बुधभूषण या मराठी काव्य अनुवादित ग्रंथाने मोलाची भर टाकली आहे.

या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन रविवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी १७ व्या छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनात होणार आहे महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे हे संमेलन होणार असून सुप्रसिद्ध साहित्यिक संतोष नारायणकर हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने या संमेलनाचे आयोजन केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×