Breking News
पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईकपुण्यात गंगाधाम रस्त्यावर रासायनिक कंपनीतून गॅस गळतीपर्वती गावात दोघांवर शस्त्राने वारखाण्याच्या पानात भांगमिश्रीत नशेच्या गोळ्यांचा वापरड्रग मुक्त पुणे जनजागृती अभियानाचा शुभारंभजिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी 

पुण्यातील तडीपार गुंडासह चौघे गजाआड

पुण्यातील तडीपार गुंडासह चौघे गजाआड

सराइताकडून पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त

marathinews24.com

पुणे – शहरातून तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग करणाऱ्या सराइतासह चौघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल, तीन काडतूसे जप्त, तसेच मोटार जप्त करण्यात आली.

जप्त वाहनांचा 15 ऑक्टोबर रोजी जाहिर ई-लिलाव – सविस्तर बातमी 

अमर हनुमंत गाडे (वय २९, रा. थिटे वस्ती, खराडी), गोपाळ संजय यादव (वय २६), सनी संजय यादव (वय २७, दोघेही रा. कामठीपुरा, हनुमान मंदिर शेजारी, ता. शिरुर), निशांत भगवान भगत (वय २७, रा. भेकराईनगर, पापडे वस्ती, फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी गाडे याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली., तसेच एक मोटार जप्त करण्यात आली.

आरोपी गोपाळ यादवला पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपार केल्यानंतर तो शहरात वास्तव्य करत होता. याबाबतची माहिती खंडणी विरोधी पथकातील (पथक दोन) पाेलीस उपनिरीक्षक गौरव देव यांना खबऱ्याने दिली. यादव आणि साथीदार हे हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी परिसरातून मोटारीतून निघाले होते. मंतरवाडी फाटा परिसरात पोलिसांच्या पथकाने सापळा लावून यादव याच्यासह चौघांना अटक केली.

पोलिसांनी त्यांच्याकडून पिस्तूल, तीन काडतुसे जप्त केली. चैाकशीत आरोपी अमर गाडे याने स्वसंरक्षणासाठी मित्रांसोबत मध्यप्रदेश येथे जाऊन ११ मे रोजी पिस्तूल खरेदी केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यासाठी आरोपी सनी यादव याने पैसे दिले होते. खंडणी विरोधी पथकाचे पाेलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गौरव देव, पोलीस कर्मचारी सुरेंद्र जगदाळे, अनिल कुसाळकर, सचिन रणदिवे, किरण पडयाळ, चेतन आपटे, दिलीप गोरे, अमोल राऊत, प्रशांत शिंदे, गणेश खरात, पवन भोसले यांनी ही कामगिरी केली. आरोपींविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक महेश नलावडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×