चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील कोंढवा, चंदननगर भागात चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून एक लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढव्यातील भागोदयनगर भागात असलेल्या केपीएच हाईट्स सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील एक लाख पचा हजार रुपयांचे साेन्याचे दागिने आणि रोकड लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकऱणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करत आहेत.
बेकायदा फलक लावणाऱ्या आंदेकर टोळीविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी
चंदननगर भागातील खराडी परिसरात सद्गुरु सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चाेरट्यांनी २६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. याबाबत एकाने चंदननगर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी तक्रारदाराच्या बंद सदनिकेचे कुलूप एक ऑक्टोबर रोजी मध्यरात्री तोडले. त्यांच्या पत्नीने पिशवीत ठेवलेले सोन्याचे दागिने लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक ढावरे तपास करत आहेत.






















