Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

कासेवाडीत अल्पवयीनांकडून १२ वाहनांची तोडफोड

कासेवाडीत अल्पवयीनांकडून १२ वाहनांची तोडफोड

चौघे अल्पवयीन ताब्यात

marathinews24.com

पुणे – रिक्षात बसण्यास मनाई केल्याने अल्पवयीनांनी भवानी पेठेतील कासेवाडी भागात दहशत माजवून १२ वाहनांची तोडफोड केली. अल्पवयीनांनी दगडफेक करुन रिक्षा, टेम्पो, मोटार अशा १२ वाहनांच्या काचा फोडल्या. याप्रकरणी चार अल्पवयीनांना खडक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संगणक अभियंता महिलेच्या विनयभंग; टीम लीडरविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुले कासेवाडी भागात वसाहतीत राहायला आहेत. संबंधित भागात दाटीवाटीने घरे आहेत. त्यामुळे या परिसरातील मुले रिक्षात गप्पा मारत थांबतात. शुक्रवारी (३ ऑक्टोबर) मुले रात्री रिक्षात गप्पा मारत होती. त्यावेळी एका रिक्षा चालकाने त्यांना रिक्षात बसण्यास मनाई केली. या कारणावरुन अल्पवयीन मुले चिडली. कासेवाडी भागातील रहिवासी पिंपळमळा परिसरात वाहने लावतात. मध्यरात्री अल्पवयीनांनी पिंपळमळा परिसरात लावलेल्या रिक्षा, टेम्पो, मोटारीच्या काचांवर गज मारले, तसेच दगडफेक करुन काचा फोडल्या.

घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट उडाली. रहिवाशांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. खडक पोलिसांनी चार अल्पवयीनांना ताब्यात घेतले. रिक्षा चालकाने अल्पवयीनांना रिक्षात बसण्यास मनाई केल्याने वाहनांची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली. शहर परिसरात किरकोळ कारणावरुन वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना वाढल्या आहेत. यापूर्वी नाना पेठेतील मंजुळाबाई चाळ, तसेच धनकवडी, बिबवेवाडी, ओैंध भागात वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना घडल्या होत्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×