Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

संगणक अभियंता महिलेचा विनयभंग; टीम लीडरविरुद्ध गुन्हा

संगणक अभियंता महिलेचा विनयभंग; टीम लीडरविरुद्ध गुन्हा

खराडी पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – संगणक अभियंता महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील एकाविरुद्ध खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार कंपनीतील वरिष्ठ सहकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट आयपीएस असल्याचे भासवून केली चप्पल-ज्वेलरी चोरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी भागातील माहिती-तंत्रज्ञान कंपनीत महिला अभियंता आहे. आरोपी या कंपनीतील ‘टिम लिडर’ आहे. शुक्रवारी (३ ऑक्टोबर) पहाटे तीनच्या सुमारास आरोपीने कंपनीतील संगणक अभियंता महिलेला बोलावून घेतले. ‘मला तुझ्याशी बोलायचे आहे’, असे सांगून त्याने महिलेला तळमजल्यावरील वाहन तळावर नेले. वाहनतळावर त्याने मोटार लावली होती. महिलेला त्याने मोटारीत बसण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने ‘महिलेला तुझी पदोन्नती, वेतनवाढ करतो’, असे सांगितले. महिलेने त्याला नकार दिला. त्यावेळी आरोपीने महिलेशी अश्लील वर्तन केले. या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. महिलेने पाेलिसांकडे तक्रार दिल्यानंतर आराेपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×