सहकारनगर भागातील बंगल्यात चंदनाची चोरी

सहकारनगर भागातील बंगल्यात चंदनाची चोरी

गेल्या काही महिन्यांपासून चंदन चोरीच्या घटनांमध्ये वाढ

marathinews24.com

पुणे – बंगल्याच्या आवारातून चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून नेल्याची सहकारनगर भागात घडली. याप्रकरणी चंदन चोरट्यांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोसायटीच्या आवारातून मोटार चोरीला, बी. टी. कवडे रस्त्यावरील घटना – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पद्मावती मंदिरामागे असलेल्या चैतन्य मंदार सोसायटीत राहायला आहेत. ३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री चोरटे बंगल्यात शिरले. चोरट्यांनी बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड कापून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस कर्मचारी नीलेश शिवतारे तपास करत आहेत. शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून चंदन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शैक्षणिक संस्थांचे आवार, शासकीय कार्यालये, तसेच सोसायटीच्या आवरातून चोरट्यांनी चंदनाची झाडे कापून नेली आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×