सोसायटीच्या आवारातून मोटार चोरीला, बी. टी. कवडे रस्त्यावरील घटना

सोसायटीच्या आवारातून मोटार चोरीला, बी. टी. कवडे रस्त्यावरील घटना

चोरट्यांविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सोसायटीच्या आवारात लावलेली पाच लाख रुपयांची मोटार चोरट्यांनी लांबविल्याची घटना घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे बी. टी. कवडे रस्त्यावरील ब्रम्हाबाग सोसायटीत राहायला आहेत.

हार्डवेअर दुकानातून १ लाखांंचे साहित्य चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (४ ऑक्टोबर) पहाटे चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाटात ठेवलेली मोटारीची चावी काढून घेतली. त्यानंतर चोरट्यांनी तक्रारदाराने सोसायटीतील तळ मजल्यावर लावलेली पाच लाख रुपयांची मोटार चोरून नेल्याचे उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण तपास करत आहेत.

फ्लॅटमधील अडीच लाखांचा ऐवज लंपास

वडगाव बुद्रुक भागातील एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख ४१ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वडगाव बुद्रुक भागातील वेदांत ॲनेक्स सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून दोन लाख ४१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्यची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×