फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहराजवळ हडपसर-सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात असलेल्या एका हार्डवेअर दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी एक लाख चार हजार रुपयांचे साहित्य (बाथरुम फिटिंग) लांबविल्याची घटना घडली. याबाबत हार्डवेअर दुकानाच्या मालकांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सनदी लेखापालाच्या कार्यालयात चोरी करणारे गजाआड – सविस्तर बातमी
तक्रारदाराचे ऊरळी देवाची परिसरात मास्टर सेल्स काॅर्पोरेशन हे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. प्रसाधन गृहासाठी वापरण्यात येणारे साहित्य चोरून चोरटे पसार झाले. पोलीस कर्मचारी गायकवाड तपास करत आहेत.
‘टॅटू’ दुकानातील साहित्य लांबविले
सारसबाग चाैपाटी परिसरातील एका टॅटू दुकानात ठेवलेले ९० हजार रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सारसबाग चौपाटी परिसरातील एका दुकानात टॅटू काढून दिले जातात. चोरट्यांनी दुकानातून टॅटू काढण्याचे यंत्र, तसेच अन्य साहित्य चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर तपास करत आहेत.





















