Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

फटाके विक्रीच्या परवान्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा

फटाके विक्रीच्या परवान्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा

उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

marathinews24.com

बारामती – दिवाळी उत्सवासाठी बारामती उपविभागात शोभेची दारू व फटाके विक्रीचे परवाने देण्यात येणार असून त्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सुप्रसिद्ध गायक जसराज जोशी यांचे “तू धाव रे” गाणं झालं लाँच – सविस्तर बातमी 

साध्या कागदावरील अर्जास 10 रूपयाचे कोर्ट फी स्टॅम्प लावणे आवश्यक आहे. व्यवसाय करावयाच्या जागेचा मिळकत रजिस्टरचा उतारा अथवा दुसऱ्याची जागा असल्यास त्या जागेचा वापर करण्यास संबंधिताचे स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र तसेच जागा सुरक्षिततेबाबत अर्जदार यांचे 100 रूपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र साक्षांकित करून देणे गरजेचे आहे.

पोलीस निरीक्षक किंवा उपनिरीक्षक यांच्याकडील शोभेची दारू व फटाके साठा, विक्रीची सुरक्षिता आणि दंड व शिक्षा झाली आहे किंवा कसे याबाबतचे प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र, व्यवसायाची जागा सुरक्षित असल्यातबाबतचे प्रतिज्ञापत्र, ग्रामपंचायत अथवा नगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र, नगरपालिका हद्दीतील स्टॉलबाबत नगरपालिकेचे दुकानासाठी जागा दिल्याच्या पत्राची प्रत, मागील वर्षाच्या परवान्याची झेरॉक्स प्रत, अर्जासोबत परवाना शुल्क 600 रुपये चलनाने भरून मूळ चलन अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

शोभेची दारू व फटाके विक्रीची मुदत 24 ऑक्टोबरपर्यंत आहे. परवान्याची मुदत संपल्यारनंतर परवाना धारकांनी शिल्लक राहीलेला साठा जवळ ठेवू नये. शिल्लक राहीलेला साठा कायम स्वरूपाचा परवाना असलेल्या परवाना धारकांजवळ ठेवणे आवश्यक आहे, असे उपविभागीय दंडाधिकारी वैभव नावडकर यांनी कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×