Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

सुप्रसिद्ध गायक जसराज जोशी यांचे “तू धाव रे” गाणं झालं लाँच

सुप्रसिद्ध गायक जसराज जोशी यांचे “तू धाव रे” गाणं झालं लाँच

निर्माते शुभम मेदनकर व शरद तांदळे यांच्याकडून प्रदर्शित

marathinews24.com

पुणे – गायक अजय गोगावले यांनी गायलेल्या ”पायी फुफाटा” या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरात लोकप्रियता मिळवली. या प्रेरणादायी गाण्याने अनेक लोकांना प्रेरित केल. ”पायी फुफाटा” गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर गुजर ब्रदर्स एंटरटेनमेंट यांनी “तू धाव रे” हे नवं प्रेरणादायी गीत नुकतच प्रदर्शित केलं आहे. गाण्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आजच्या तरुण पिढीला नवी आशा देणार, त्यांच्या पंखांना बळ देणार हे गाण आहे. एका छोट्याशा गावातला तरुण हाल अपेष्टा सोसून, पदरी जे मिळेल ते काम करून आपलं स्वप्न पूर्ण करतो. त्याच्या आयुष्याला कलाटणी कशी मिळते. हे या गाण्यात सुंदररित्या मांडले आहे. हे गाणं प्रेक्षकांना एक ताजं प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी संगीत अनुभव देण्याचे वचन देत आहे.

डॉ. सलमा खान यांना राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान – सविस्तर बातमी 

गाण्यात अभिनेता सुजित चौरे आणि अभिनेत्री श्वेता काळे यांची जोडी आहे. हे गाण सुप्रसिद्ध गायक जशराज जोशी आणि गायिका सोमी शैलेश यांनी गायले आहे. अजित मांदळे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी संगीत दिलं आहे. डीओपी रवी जावरे यांनी केलं आहे. गुजर ब्रदर्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार झालेल्या “तू धाव रे” गाण्याचे निर्माते शुभम मेदनकर आणि शरद तांदळे आहेत. याबाबत अभिनेता सुजित चौरे गाण्याच्या संकल्पनेविषयी म्हणाले, “लगन या माझ्या पहिल्या सिनेमातील “पायी फुफाटा” गाण्याला लोकप्रियता मिळाली म्हणून मी “तू धाव रे” हे गाण करण्याचा निर्णय घेतला. माझ्या जवळच्या मित्रांना पाहून मी इन्स्पायर झालो. माझ्या मित्रांनी शून्यातून सुरुवात करून आज ते बिज़नेस क्षेत्रात प्रगती करत आहेत. मी हे बबन अडागळेंना सांगितल आणि हे गाण बनल आहे.

आम्ही हे गाण मे महिन्यात पुण्यात ४२ सेल्सिअस तापमानात शूट केल आहे. गाण्याच्या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून खूप आनंद होत आहे. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी पायी फुफाटा गाण्यावर जस प्रेम केल तसच या गाण्यावरही करावं.

निर्माते शरद तांदळे आणि शुभम मेदनकर म्हणतात, “गाण्यातून आम्हाला कुठल्याही पैशाची अपेक्षा नाही. ‘तू धाव रे’ हे गाणं आम्ही महाराष्ट्रातील त्या प्रत्येक मेहनती आणि जिद्दी व्यक्तीला समर्पित करतो जी आपल्या स्वप्नांच्या दिशेने न थकता वाटचाल करत आहे. आम्ही हे गाणं त्यांना प्रेरणा देण्यासाठी बनवलं आहे. महादेव सर्वांचं भलं करो!”

Link : https://youtu.be/pS_WUddAlrA?si=RXsHwkYC0Log2jH5

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×