शेअर मार्केटसह आयपीओमधील गुंतवणूक पडली ५१ लाखांना

तरुणाला शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली १७ लाखांना

उंड्रीतील जेष्ठाला गंडा

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींग आणि आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्याने एका जेष्ठाला तब्बल ५१ लाख ७० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २ ऑगस्ट ते ११ ऑक्टोबर २०२४ कालावधीत घडली असून, जेष्ठाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहनचोरी करणार्‍या अल्पवयीनांचा पर्दाफाश – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक उंड्रीत राहायला असून, २ ऑगस्ट २०२४ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला होता. शेअर ट्रेडींग आणि आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीचा नफा मिळवून देतो, अशी बतावणी केली. सायबर चोरट्यांनी विश्वास संपादित केल्यानंतर जेष्ठाने गुंंतवणूक करण्यास सुरूवात केली. अवघ्या तीन महिन्यात तब्बल ५१ लाख ७० हजार रूपये वर्ग करूनही सायबर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करीत आहेत.

पार्टटाईम नोकरीच्या आमिषाने तरूणाला फसवले

पार्टटाईम नोकरी मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी २२ वर्षीय तरूणाची ३ लाख ३८ हजारांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. टेलीग्राम आयडीद्वारे लिंक पाठवून त्यावर नोंदणी करण्यास सांगून ऑनलाईनरित्या गंडा घातला आहे. ही घटना ११ ते १६ ऑगस्ट २०२५ कालावधीत शेवाळवाडीत घडली आहे. याप्रकरणी तरूणाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आणि टेलीग्राम आयडीधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×