८ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस, हडपसर पोलीसांची कारवाई
marathinews24.com
पुणे – शहरातील हडपसर परिसरात वाहनचोरी करणार्या दोघा अल्पवयीनांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून वाहन चोरीचे ८ गुन्हे उघडकीस आणून, गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. मौजमजा करण्यासाठी त्यांनी वाहनांची चोरी केल्याची कबुली दिली आहे. पेट्रोलिंगदरम्यान अल्पवयीन चोरट्यांनी माहिती हडपसर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीची वाहने जप्त केली आहेत.
पुण्यात वेगवेगळ्या अपघातात दुचाकीस्वारांचा मृत्यू – सविस्तर बातमी
पौर्णिमेनिमित्त हडपसर तपास पथक ६ ऑक्टोबरला हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार अमित साखरे आणि महावीर लोंढे यांना वाहनचोरी करणार्या दोन अल्पवयीन चोरट्यांनी माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्याकडून देशी बनावटीचा गावठी कट्टा, काडतुसे ८ वाहने जप्त करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे, पोनि (गुन्हे), पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने अल्पवयीनांकडे कसून तपास केला. त्यानुसार त्यांनी वर्षभरात मौजमजेसाठी हडपसर परिसरान अनेक दुचाकी व रिक्षांची चोरी करून सोडून दिल्याचे सांगितले.
तपासादरम्यान अल्पवयीन चोरट्यांनी ८ गुन्ह्यांची घटनास्थळे पोलिसांना दाखविली. त्यानुसार पथकाने त्यांच्याकडून वाहने जप्त करीत कारवाई केली. शस्त्र जप्तीबरोबरच वाहनचोरीतील प्रकरणांचा छडा लावण्यात यश मिळवले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी अनुराधा उदमले, वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले, उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखील पवार, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, महाविर लोंढे, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे यांनी केली.























