Breking News
Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळाMobile Theft in Pune : नवले पुलाजवळ तरुणाचा मोबाइल हिसकावलाPune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात दुचाकीस्वारांचा मृत्यू

Pune Car Accident News

हडपसर आणि कोंढवा परिसरात अपघाताच्या घटना

marathinews24.com

पुणे – शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हडपसर आणि कोंढवा परिसरात अपघाताच्या घटना घडल्या. कोंढवा भागात भरधाव दुचाकी समोरुन येणाऱ्या वाहनावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शानुर युनूस बागवान (वय ४१, रा. नवाजीश पार्क, कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

कौटुंबिक वादातून पत्नीचा खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार बागवान हे ५ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास कोंढव्यातील लुल्लानगर भागातून ज्योती हाॅटेल चाैकाकडे भरधाव वेगाने निघाले होते. त्यावेळी गतीरोधकावर भरधाव दुचाकीस्वार बागवान यांचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी एका वाहनावर आदळली. दुचाकीस्वार बागवान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या बागवान यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

हडपसर-सासवड रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (७ ऑक्टोबर) सायंकाळी घडली. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत गणेश श्रीराम सिरसाठ (वय ४९, रा. मंगरूळ, ता. चिखली, जि. बुलढाणा) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिनेश श्रीराम सिरसाठ (वय ३८) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार दिनेश हे मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हडपसर-सासवड रस्त्याने निघाले होते. त्यावेळी सातववाडी पीएमपी थांब्यासमोर भरधाव वाहनाने दुचाकीस्वार दिनेश यांना धडक दिली. अपघातात दिनेश हे गंभीर जखमी झाले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक रोकडे तपास करत आहेत. शहरात गंभीर स्वरुपांच्या अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आठवडभरात शहर, तसेच उपनगरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश अपघात भरधाव वेगामुळे झाले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×