कौटुंबिक वादातून पत्नीचा खुनाचा प्रयत्न

भांड्याचा वाद जीवावर बेतला, दाम्पत्याने केला खून

नगर रस्त्यावरील केसनंद भागातील घटना

marathinews24.com

पुणे – कौटुंबिक वादातून महिलेचा दांडक्याने बेदम मारहाण करुन खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नगर रस्त्यावरील केसनंद भागात ही घटना घडली. सुशीला बिराप्पा खांडेकर (वय ४५, रा. लाडबा वस्ती, केसनंद, नगर रस्ता) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती बिराप्पा शंकर खांडेकर (वय ५०) याला अटक करण्यात आली. समर्थ बिराप्पा खांडेकर (वय २२) याने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात रात्री १० नंतर फटाके वाजवण्यास बंदी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्लया माहितीनुसार, खांडेकर दाम्पत्य मजुरी करते. आरोपी बिराप्पा हा पत्नी सुशीला यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांचा छळ करायचा. ६ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. वादातून बिराप्पाने पत्नीला दांडक्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत त्यांचे डोके, नाकाला गंभीर दुखापत झाली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी पती बिराप्पाला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक शेंडगे तपास करत आहेेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×