पुण्यात रात्री १० नंतर फटाके वाजवण्यास बंदी

शोभेच्या दारू व फटाक्यांच्या दुकानांपासून १०० मीटर परिसरात धूम्रपानास, फटाके वाजविण्यास बंदी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी घेतला निर्णय

marathinews24.com

पुणे – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी फटाके विक्रीसह वाजवण्यासंबंधी नियम केले आहेत. नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

पुण्यातील गुंड टिपू पठाणचे बँक खाते गोठविले – सविस्तर बातमी

फटाक्यांच्या आवाजामुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये रात्री १० ते सकाळी ६ वाजेदरम्यान फटाके वाजविण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. पोलिसांनी जाहीर केलेल्या नियमांनुसार, ‘अ‍ॅटमबॉम्ब’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या विशिष्ट स्फोटक फटाक्यांच्या उत्पादनावर आणि जवळ बाळगण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे कोणत्याही नागरिकाला रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनी निर्माण करणारे फटाके वाजवता येणार नाहीत.

रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालये यांच्या १०० मीटर परिसरात म्हणजेच शांतता प्रभागात कोणत्याही वेळेत फटाका वाजवण्यास सक्त मनाई आहे.विक्रेत्यांसाठीही नियम कडक करण्यात आले आहेत. पुणे शहरात २० ते २४ ऑक्टोबर या काळातच तात्पुके विक्री परवाने वैध असतील. रस्त्यापासून १० मीटर अंतराच्या आत किंवा महामार्ग/पुलावर फटाके फोडणे, फेकणे किंवा अग्निबाण उडवण्यासही मनाई करण्यात आली आहे. फटाक्यांच्या आवाजाची मर्यादा चार मीटर अंतरावर १२५ डेसीबलपेक्षा जास्त नसावी, या नियमाची विक्रेत्यांनी काटेकोर अंमलबजावणी करावी. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×