Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

रिक्षांच्या टायर चोरणार्‍याला २४ तासांत अटक

रिक्षांच्या टायर चोरणार्‍याला २४ तासांत अटक

काळेपडळ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – रिक्षांच्या टायरसह स्टेपनी चोरणार्‍याला २४ तासात अटक करण्यात काळेपडळ पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून २ लाख ५६ हजारांचे रिक्षांचे टायर, स्टेपनी जप्त केले आहेत. शादाब युसुफ अन्सारी ( वय २० रा. गल्ली नं. २४, सय्यदनगर, हडपसर, पुणे) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोथरूडमध्ये घरफोडी, १७ लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी

काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, अंमलदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, श्रीकृष्ण खोकले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे, अतुल पंधरकर, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे नितीन ढोले हे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार शाहिद शेख व अतुल पंधरकर यांना एकजण रिक्षामध्ये रिक्षाची टायर ठेउन, लक्ष्मीपार्क पालखी मार्ग रस्त्यालगत थांबल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडील टायर चोरीचे असल्याचे समजले.

चोरट्याची माहिती मिळताच तपास पथकाने वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती देउन घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर शादाब युसुफ अन्सारी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ लाख ५६ हजारांचे रिक्षांचे टायर, स्टेपनी जप्त केली आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, अंलदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, श्रीकृष्ण खोकले, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×