Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

पूरग्रस्त नागरिकांसाठी अवामी महाज, आझम कॅम्पसची मदत रवाना

पूरग्रस्त नागरिकांसाठी अवामी महाज, आझम कॅम्पसची मदत रवाना

पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मदतीचा हात

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्रातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘अवामी महाज’ सामाजिक संघटना,महाराष्ट्र कॉसमोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट आणि डॉ.पी.ए.इनामदार विद्यापीठ या संस्थांतर्फे पूरग्रस्त नागरिकांसाठी अन्नधान्य,भांडी, ब्लँकेट्स, कपडे,पिण्याचे पाणी, स्वच्छता साहित्य आणि वैद्यकीय मदत यांचे वितरण करण्यात आले. ही मदत मोहीम डॉ. पी.ए.इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार आणि संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती आबेदा पी. इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर, बीड, नांदेड, लातूर,उदगीर या परिसरात पार पडली.

‘त्रिधारा’मध्ये रसिकांनी अनुभवला सुरेल स्वराविष्कार – सविस्तर बातमी 

यासाठी तयार करण्यात आलेल्या संचात (किट)मध्ये ६० पेक्षा अधिक जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.या कार्यासाठी तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. त्यांनी महाराष्ट्रातील विविध पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये जाऊन मदत पोहोचवली.

या उपक्रमात आझम कॅम्पस आणि अवामी महाज संस्थेचे स्वयंसेवक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. मशकूर शेख, साबीर शेख, गौस उर्फ बबलू सय्यद, सादिक लुकडे आणि इतर सदस्यांनी पूरग्रस्त नागरिकांना मदतसाहित्य वाटप करून सामाजिक जबाबदारीचे उदाहरण घालून दिले.या प्रयत्नातून संस्थांनी मानवता,सामाजिक बांधिलकी आणि सहकार्याची भावना दृढ केली असून भविष्यातही कोणत्याही आपत्तीच्या काळात लोकसेवेच्या कार्यात अग्रेसर राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×