Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात ४ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सव

पुण्यात ४ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सव

‘विकसित भारत @ 2047’ या पार्श्वभूमीवर महोत्सव

marathinews24.com

पुणे – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे या कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2025-26 चे आयोजन करण्यात येणार आहे. ‘विकसित भारत @ 2047’ या पार्श्वभूमीवर हा महोत्सव दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज, कॅम्प, पुणे येथे पार पडणार आहे.

पूरग्रस्त नागरिकांसाठी अवामी महाज,आझम कॅम्पसची मदत रवाना – सविस्तर बातमी 

महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा, कथा लेखन, चित्रकला, लोकनृत्य, लोकगीत, कविता लेखन, नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन) इत्यादी स्पर्धांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय विजेत्यांना प्राविण्य प्रमाणपत्र आणि बक्षीस रक्कम देण्यात येईल. तसेच प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना विभागीय आणि राज्यस्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धकांसाठी वयोगट १५ ते २९ वर्षे असा निश्चित करण्यात आला असून वयाची गणना 12 जानेवारी 2026 रोजी करण्यात येईल. नावनोंदणी करताना आधार कार्ड आणि जन्मदाखला जोडणे आवश्यक आहे; शाळेचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.

इच्छुक स्पर्धकांनी आपले प्रवेश अर्ज व आवश्यक कागदपत्रे दि. १ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत dsopune6@gmail.com ई-मेल अथवा व्हॉटस् अपद्वारे अश्विनी हत्तरगे, क्रीडा अधिकारी – 7387880427, ताहेर आसी – 9145402115, आशद शेख – 8484803529 सादर करावेत. सर्व स्पर्धकांनी ‘माय भारत’ पोर्टलवर वैयक्तिक नोंदणी करणे अनिवार्य आहे.

पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कला अकादमी व संस्था येथील इच्छुक कलावंतांनी या महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन , जिल्हा क्रीडा अधिकारी, जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×