Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

‘पुणे आर्टिस्ट ग्रुप’चे महाचित्रप्रदर्शन

'पुणे आर्टिस्ट ग्रुप'चे महाचित्रप्रदर्शन

पूरग्रस्त विद्यार्थ्यांना होणार शैक्षणिक मदत

marathinews24.com

पुणे – पुरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी पुणे आर्टिस्ट ग्रुप तर्फे ‘वाटा खारीचा सहभाग चित्रकारांचा’ या उपक्रमांतर्गत एक महाचित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १५ ते १८ ऑक्टोबरपर्यंत बालगंधर्व कलादालन, पुणे येथे भरविण्यात येणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन विनामूल्य खुले असेल. राज्यातील ३०० पेक्षा अधिक कलाकार सहभागी होणार आहेत. त्यांच्या कलाकृती विक्रीसाठी उपलब्ध असून सर्व चित्रांची किंमत समान ठेवण्यात आली आहे. विक्रीतून जमा झालेली सर्व रक्कम मराठवाड्यातील मुलांच्या शिक्षण साहित्यासाठी देण्यात येणार आहे.

पुण्यात ४ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सव – सविस्तर बातमी 

प्रदर्शनात पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, सातारा, छत्रपती संभाजीनगर अशा शहरातील चित्रकारांच्या कलाकृती असणार आहेत. चित्रकार यासाठी कोणताही मोबदला घेणार नाहीत. कलाप्रेमी आणि संवेदनशील पुणेकरांनी प्रदर्शनाला भेट द्यावी.तसेच प्रत्येकाने कमीत कमी एक आणि शक्य होईल त्याप्रमाणे अधिकाधिक चित्रे विकत घ्यावीत,असे आवाहन ‘पुणे आर्टिस्ट ग्रुप’ तर्फे चित्रकार सुरेंद्र कुडपणे-पाटील यांनी केले आहे.आधिक माहिती साठी चित्रकार सुरेंद्र कुडपणे पाटील 98 81 23 24 25 यांना संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

उपक्रमात चित्रकारांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत आपापल्या कलाकृती देणगी स्वरूपात प्रदर्शनासाठी दिल्या आहेत. या कलाकृतींच्या विक्रीतून जमा होणारी संपूर्ण रक्कम पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षण साहित्य खरेदीसाठी वापरली जाणार आहे.पुणे आर्टिस्ट ग्रुपने यापूर्वीही कोल्हापूर-सांगली पूरस्थितीत मदतकार्य केले असून, त्या वेळी संवेदनशील कलाकारांनी देणगीस्वरूपात दिलेल्या कलाकृतींच्या विक्रीतून लाखो रुपयांची रक्कम विद्यार्थ्यांच्या साहित्यासाठी वापरण्यात आली होती. यंदा मराठवाड्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी कलाकार पुन्हा एकदा एकत्र येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×