Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

चोरीच्या मोटारीतून प्रवास करीत घरफोड्या, सराईताला अटक

२१ लाख ४० हजारांचा ऐवज जप्त

marathinews24.com

पुणे – चोरीच्या मोटारीतून प्रवास करीत घरफोडी करणार्‍या सराईताला गुन्हे शाखेच्या युनीट सहाने अटक केली. त्याच्याकडून मोटारीसह दागिने असा मिळून २१ लाख ४० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. संबंधित आरोपी मोक्कातील गुन्ह्यात जामिनावर सुटलेला असून, त्याच्याविरूद्ध यापुर्वी येरवडा, चिखली, भोसरी एम.आय.डी.सी. संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. बिरजू राजपूतसिंग दुधानी ( वय ४० रा. रामटेकडी, वानवडी) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे.

दागिने चोरट्यांना बेड्या, ५ गुन्हे उघडकीस – सविस्तर बातमी 

गुन्हे शाखेच्या युनीट सहाचे पथक १२ ऑक्टोबरला पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार नितीन मुंढे व कानिफनाथ कारखेले यांनी खराडी रोड, वाघोलीतून विनाक्रमांक मोटारीतून प्रवास करणार्‍या बिरजू दुधाणी याला ताब्यात घेतले. त्याचेकडे तपास केला असता त्याच्याकडे घरफोडीचे गुन्हयांतील वेगवेगळया वर्णनाचे सोन्याचे दागिणे मिळुन आले. आरोपीकडुन चोरीची गाडी व सोन्याचे दागिणे असा २१ लाख ४० हजारांचा ऐवज जप्त केला.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, एपीआय राकेश कदम, एपीआय मदन कांबळे, अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, सचिन पवार, निर्णय लांडे, नेहा तापकीर, ऋषीकेश ताकवणे, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे, सोनाली नरवडे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×