Breking News
नामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागात

दागिने चोरट्यांना बेड्या, ५ गुन्हे उघडकीस

पुण्यात नशेसाठी इंजेक्शनचा वापर, ५ जण अटकेत

विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – शहरातील विश्रांतवाडी परिसरात चोरी, जबरी चोरीसह बसमध्ये महिलांचे दागिने चोरणार्‍यांना पोलिसांनी अटक केले आहे. त्यांच्याकडून ६ लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. विश्रांतवाडी तपास पथकाने अवघ्या काही दिवसांत सोनसाखळी चोरट्यांचा माग काढून त्यांना अटक केल्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. सुदर्शन ऊर्फ दादुन्या रामू जाधव (वय २१ रा. भेकराईनगर हडपसर) बालाजी राजू उमाप (वय २० गुलटेकडी) यश हरीष खर्डेकर (वय २४) प्रशांत अनिल पवार (वय ३४ रा. मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पुण्यात पोलिस कर्मचार्‍याला मारहाण, टोळक्याविरूद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

विश्रांतवाडीत बस प्रवासादरम्यान महिलांना लक्ष्य करीत त्यांचे दागिने चोरून नेल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी महेश भोसले यांनी तांत्रिक तपास केला. त्यानुसार पहिल्या गुन्ह्यात सुदर्शन जाधव याला अटक करून त्याच्याकडून ३ लाखांचे पाच तोळे सोन्याच्या बांगड्या जप्त केल्या. दुसर्‍या गुन्ह्यातील बालाजी उमाप आणि यश खर्डेकर यांना ताब्यात घेउन १६ ग्रॅम वजनाची सव्वा लाखांची चैन जप्त केली. तिसर्‍या गुन्ह्यात बसप्रवात जेष्ठ महिलेच्या हातातील सोन्याची पाटली चोरणार्‍या प्रशांत पवार याला अटक करीत एक लाखांचा ऐवज जप्त केला.

तपास पथकाने आरोपी प्रशांत अनिल पवार याच्याकडे केलेल्या चौकशीत तब्बल तीन चोर्‍या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यातील ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, एसीपी विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे, उपनिरीक्षक महेश भोसले, अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, संपत भोसले, संजय बादरे, वामन सावंत, धवल लोणकर, विशाल गाडे, अक्षय चपटे, किशोर भुसारे, प्रमोद जाधव, होना साबळे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×