टोळक्याविरूद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – रस्त्याच्या कडेला लघवीसाठी थांबलेल्या पोलीस शिपायाला चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. याप्रकरणी मारहाण करणार्यांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला प्रवीण रमेश डिंबळे (वय ३३) असे मारहाण झालेल्या शिपायाचे नाव असून, ते भारती विद्यापीठ पोलीस वाहतूक विभागात कार्यरत आहेत.
तुळशीबागेत महिलेच्या पिशवीतून रोकड चोरणाऱ्या महिला गजाआड – सविस्तर बातमी
अमलदार प्रवीण डिंबळे हे रविवारी रात्री आपली संपवून दुचाकीने घरी जात होते. कात्रज-कोंढवा मुख्य रस्त्यावर कडेला अंधारात ते लघुशंकेसाठी थांबले होते. त्याचवेळी डिंबळेला जागा मालकाने येथे लघु शंका करू नका म्हणून हटकले. त्यानंतर दोघांच्या झालेल्या बाचाबाचीत डिंबळे यांनी लघुशंकेस हटकणार्या व्यक्तीच्या तोंडावर बुक्की मारली. त्यामुळे त्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर संबधीत व्यक्तीने ओळखीच्या माणसांना बोलवले. त्यांनीही पोलिस शिपायाला मारहाण केली. पोलिस असल्याची कल्पना असूनही आरोपींनी त्यांना कोणतीही दया माया न दाखवता बेदम मारहाण केली. डिंबळे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तात्काळ ससून हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले आहे. माहिती मिळताच कोंढवा पोलीस ठाण्यातील अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक मोहसीन पठाण आणि त्यांच्या सहकार्यांनी हॉस्पिटलला धाव घेतली.



















