पिशवीतून रोकड चोरणाऱ्या दोन महिलांना विश्रामबाग पोलिसांनी केली अटक
marathinews24.com
पुणे – दिवाळीनिमित्त तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून रोकड चोरणाऱ्या दोन महिलांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. अनिसा सोहेल शेख (वय ४०), मेहराज सोहेल शेख (दोघी रा. पद्मजी पोलीस चौकीजवळ, भवानी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यात वारजे, प्रभात रस्त्यावर महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३८ वर्षीय महिला तुळशीबागेत रविवारी (१२ ऑक्टोबर) दुपारी तीनच्या सुमारास खरेदीसाठी आल्या होत्या. दिवाळीनिमित्त तुळशीबागेत खरेदीसाठी गर्दी झाली होती. गणपती चौक परिसरात गर्दीत महिलेच्या पिशवीची चेन उघडून आरोपी शेख यांनी साडेसात हजार रुपयांची रोकड लांबविली. महिलेच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तिने आरडाओरडा केला. गर्दीतून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या दोघींनी पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस हवालदार पाटील तपास करत आहेत.





















