Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

नटपरी चालकाला मारहाण करत शस्त्राचा धाक दाखवून लुबाडले; हडपसरमधील चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : मराठी न्यूज 24. कॉम – पान टपरी चालकाला धमकावुन चौघा जणांनी हाताने मारहाण करुन खिशातील पैसे जबरदस्तीने चोरले. तसेच पान टपरी व मोटारसायकलवर दगड मारुन नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत विशाल जयपाल बनसोडे (वय २०, रा. साडेसतरा नळी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अभिषेक ऊर्फ अभ्या पाचपवार, रोहित शिंदे, निरंजन सोनवणे आणि आतिश साठे (रा. हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार साडेसतरानळी येथील ग्रामपंचायत कॅनॉलजवळ १९ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पान पटरी आहे़ ते पान टपरीमध्ये असताना १९ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजता त्यांच्या परिसरातील अभिषेक पाचपवार, रोहित शिंदे, निरंजन सोनवणे, आतिष साठे तेथे आले. पाचपवार याने हातातील लोखंडी हत्यार दाखवून बनसोडे यांना बाहेर निघ असे बोलला. त्याला घाबरुन ते बाहेर आले. अभिषेक याने हातातील लोखंडी हत्याराने त्यांना लय माजला काय, असे बोलून हत्याराने मारले. तेव्हा ते मागे सरकून पळून जाऊ लागले. त्यांनी हत्याराचा वार चुकविला. तरी तो त्यांच्या पाठीवर लागल्याने त्यांना दुखापत झाली. त्याच्या साथीदारांनी बनसोडे यांना पकडून हाताने मारहाण केली. हत्याराचा धाक दाखवून खिशातील २६०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. टपरीवर दगड व हातातील लोखंडी हत्याराने मारले. शेजारी पार्क केलेल्या मोटारसायकलवर दगड व हत्याराने मारुन नुकसान केले. सहायक पोलीस निरीक्षक दिपिका जौंजाळ तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×