कुख्यात घायवळचा साथीदार बनला गांजा तस्कर

कुख्यात घायवळचा साथीदार बनला गांजा तस्कर

मोक्कात होता पसार, आरोपीला बेड्या

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात दहशत निर्माण करून आर्थिंक साम्राज्य वाढवणार्‍या कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्यासोबत गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपीला बेड्या ठोकल्या. मोक्कानंतर संबंधित आरोपी पसार झाल्यानंतर त्याने थेट अमली तस्करी सुरू करीत गैरमार्गाने रक्कम गोळा करण्याचा उद्योग सुरू केला. घायवळच्या आशीवार्दाने त्याने गांजा तस्करी सुरू केली होती. मात्र, खंडणी विरोधी पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या असून, दोघांना अटक केली आहे. कुख्यात घायवळचा याप्रकरणात काही हात आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

कंपनीचे कंत्राट देण्याच्या नावाखाली २६ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

मुसाब इलाही शेख (वय ३५ रा. शास्त्रीनगर, कोथरूड) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध नुकतीच मोक्कानुसार कारवाई करण्यात आली होती. मात्र, अटकेच्या भीतीने संबंधित आरोपी पसार झाला होता. कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्यासोबत अनेक गंभीर गुन्ह्यातही मुसाबचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान मुसाबला ८७८ ग्रॅम गांजा विक्री करण्यासाठी देणारा तेजस पुनमचंद डांगी (वय ३३ रा. मानाजीनगर, नर्‍हे) यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घायवळविरूद्ध कारवाईचा बडगा उगारल्यानंतर त्याच्या पंटरनांही पोलिसांनी घेरले आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासानुसार आरोपी मुसाबविरूद्ध कोथरूड पोलीस ठाण्यातंर्गत आर्म अ‍ॅक्ट, मोक्कासह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल आहे. त्यासोबतच गांजा बाळगल्याप्रकरणी एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार सिंहगड पोलीस ठाण्यातंर्गत नुकताच गुन्हा दाखल झाला होता. तर आरोपी तेजस डांगी याच्याविरूद्ध एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार हिंजवडी पोलीस ठाण्यातंर्गत गुन्हा दाखल आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त, निखील पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या युनीटने केली आहे.

कुख्यात घायवळ टोळीतील मोक्का गुन्ह्यात पसार असलेल्या आरोपीसह दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनने अटक केली आहे. संबंधित सराईताकडून ८७८ ग्रॅम ग्रांजा जप्त केला असून, याप्रकरणी आणखी तपास केला जात आहे. – पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×