चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – कंपनीचे कंत्राट देण्याच्या नावाखाली साबयर चोरट्यांनी तरूणाला तब्बल २६ लाख ८५ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २५ फेबु्रवारी ते १२ मार्च कालावधीत चतुःशृंगी परिसरात घडली आहे. याप्रकरणी तरूणाने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आणि बँक खातेधारकांविरूद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंढवा खुर्द, महमंदवाडीत घरफोडी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण चतुःशृंगी परिसरात राहायला असून, २५ फेबु्रवारीला सायबर चोरट्याने त्यांना फोन केला. कंपनीचे टेंडर देण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी त्यांचा विश्वास संपादित केला. त्यानुसार तक्रारदाराने संबंधिताच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करण्यास सुरूवात केली. अवघ्या १५ दिवसांत तब्बल २६ लाख ८५ हजार रूपये त्यांनी वर्ग केले. मात्र, त्यांना कोणत्याही कंपनीचे टेंडर मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक अश्विनी ननवरे तपास करीत आहेत.





















