Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

मनी लॉड्रींगची दाखविली भीती, जेष्ठाला २३ लाखांचा घातला गंडा

पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – टेलिकॉम डिपार्टमेंट ऑफ इंडिया दिल्लीतून बोलत असल्याची बतावणी करीत, सायबर चोरट्याने जेष्ठ नागरिकाला मनी लॉड्रींगची भीती दाखवून तब्बल २३ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २५ ऑगस्टला सहकारनगर परिसरात घडला आहे. याप्रकरणी ७८ वर्षीय नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइल धारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र लांबवले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ७८ वर्षीय जेष्ठ नागरिक असून, सहकारनगरमध्ये राहायला आहेत. २५ ऑगस्टला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन करून टेलिकॉम डिपार्टमेंट ऑफ इंडिया दिल्लीतून बोलत असल्याची बतावणी केली. त्यांचा विश्वास संपादित केल्यानंतर सायबर चोरट्यांनी तक्रारदाराच्या खात्यात मनी लॉड्रींगचे पैसे ट्रान्सफर झाल्याचे सांगण्यात आले. पोलीस तपासात सहकार्य करा, अन्यथा तुमच्याविरूद्ध कारवाई केली जाईल, असे सायबर चोरट्यांनी त्यांना धमकावले. त्यांच्याकडून २३ लाख रूपये वर्ग करून घेत ऑनलाईन फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×