Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

पुण्यात ऐन दिवाळीत दुचाकीस्वार चोरटे सुसाट

पुण्यात ऐन दिवाळीत दुचाकीस्वार चोरटे सुसाट

महिलांचे दागिने हिसकावले; शुक्रवार पेठ,लाेणीकंदमधील घटना

marathinews24.com

पुणे – शहरातील पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील १ लाख ९० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना शुक्रवार पेठेतील साठे काॅलनीत घडली. पसार झालेल्या चोरट्यांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात महिलेच्या गळ्यातील दागिने बुलेटस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले.

स्वारगेट, स्टेशन परिसरात मोबाइल हिसकावले – सविस्तर बातमी 

पाहिल्या घटनेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६४ वर्षीय ज्येष्ठ महिला शुक्रवार पेठेतील साठे काॅलनीत राहायला आहेत. त्या शनिवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी सहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेला अडवले आणि पत्ता विचारण्याचा बहाणा केला. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून दुचाकीस्वार चोरट्यांनी गळ्यातील एक लाख ९० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे तपास करत आहेत.

बुलेटस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील दीड लाखाचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना नगर रस्त्यावरील लोणीकंद भागात घडली. याबाबत एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ५७ वर्षीय महिला लोणीकंद भागात राहायला आहेत. त्या शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) दुपारी पावणेचारच्या सुमारास लोणीकंदमधील थेऊर फाटा परिसरातून निघाल्या होत्या. त्यावेळी बुलेटवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलीस उपनिरीक्षक तुकाराम सुरवसे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×