स्वारगेट आणि बंडगार्डन पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील स्वारगेट आणि पुणे स्टेशन परिसरात दोघांचे मोबाइल हिसकावून नेण्यात आल्याच्या घटना घडल्या. याप्रकरणी स्वारगेट आणि बंडगार्डन पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोक्का’ कारवाईनंतर फरार झालेला गुंड गजाआड – सविस्तर बातमी
स्वारगेट एसटी स्थानक परिसरात थांबलेल्या एका तरुणाच्या हातातील ४० हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण मूळचा सोलापूरचा आहे. तो ४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास स्वारगेट स्थानकासमोर थांबला होता. त्यावेळी दोन चोरट्यांनी तरुणाच्या हातातील मोबाइल हिसकावून नेला. तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली असून, पोलीस उपनिरीक्षक निकिता पवार तपास करत आहेत.
पुणे स्टेशन परिसरात एका तरुणाकडील मोबाइल हिसकावून नेल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एका तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते तपास करत आहेत.




















